केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. ...
टिकैत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. ...
आमच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी ठरविलेले कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली. ...
कंगना रणौतने (Kangana Ranaut) काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. ...
टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही, जे काही केलंय ते मोदींनी केलंय, असं निक्षून सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलंय. ...