Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
New Parliament Inauguration: राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवले. ...