बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले. ...
बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले. ...
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब अांबेडकर संघर्ष समितीच्या वतीने 14 एप्रिल राेजी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे माेफत वाटप करण्यात येणार अाहे. त्यासाठी छत्रपती-फुले-शाहू-अांबेडकर विचाररथ तयार करण्यात आला अाहे ...
१४ व १५ एप्रिल रोजी दीक्षाभूमीच्या सभागृहात एकत्रितपणे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत विमलकित्ती गुणसिरी, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी संयुक्त जयंतीच्या आयोजनाबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. ...
वाशीम - स्थानिक नालंदानगर येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त जयंती उत्सव समितीच्यावतीने ११ ते १४ एप्रिलपर्यत विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...