धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
बीडच्या लोकसभा निवडणुकीत लागणाऱ्या निकालातील महाआघाडीची लीड पाहून क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडला असा टोला मुंडेनी लगावला. ...
दुष्काळामुळे यावर्षी परळी शहरात पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी परळी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असून नगरसेवकांनी आणि पालिकेने अधिक दक्षतेने काम करावे अशी सूचना विधान परिषदे ...
येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे. ...
काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथून अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी उद्धव अफजल खानाला मुजरा घालून जय गुजरात म्हणून आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...