धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
‘गोकुळ’च्या विरोधात मोहीम उघडलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेचा निषेध करण्याबरोबरच गाय दूधास प्रतिलिटर पाच रूपये अनुदान सरकारने द्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर ...
लाखो दूध उत्पादक व माता-भगिनींच्या कष्टाने राज्यासह देशभरात यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाला राजकीय हेतूने स्वार्थापोटी बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ही बदनामी इथून पुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी आमदार ...
वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित पुस्तक ‘रस्ते सुरक्षा ’ संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले. ...