धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
कुरकुरीत शेव, लालेलाल तवंग, उकडलेल्या बटाट्याच्या लहान-लहान फोडी आणि त्याच्या सोबतीला लिंबू,पाव घेत खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापूर महापालिकेजवळील एका हॉटेलमध्ये महाडिक यांनी पातळ-भाजीचा आस्वाद घेत २०१९ च्या ...
प्रा. संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंडलिकप्रेमी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी तिथेच जाऊन मिसळ पार्टीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील ...
लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ...
खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ...