धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी महाडिक यांच्या भाजपप्रवेशाविषयी चर्चा ...
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकारत आहे. ...
डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहचला आहे. याची साक्ष “आपल ठरलंय” ही पोस्टच देते. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे उद्या, गुरुवारी तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक हे सोमवारी (दि. १) आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने ...
ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही पाळणा हलत नाही म्हटल्यावर दुसऱ्याची मुले दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली असून, आयाराम-गयारामांच्या कौतुकातच सत्तेची पाच वर्षे गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश ...