धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
मैदान दिल्लीचे, दोन्ही मल्ल कोल्हापूरचे आणि जिंकले मात्र भाजप आखाड्याचे वस्ताद देवेंद्र फडणवीस... अशीच काहीशी कुस्ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिली. ...
प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यात भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला. जिल्हा परिषदेत सत्ता आली. परंतू विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप ‘बॅकफुट’वर आली. ...
राजकीय पटलावरील ताकदवान असणाऱ्या महाडिक कुटूंबाच्या राजकारणाला गेल्या काही वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र अखेर ही घरघर संपली. ...