दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
अखेरच्या चेंडूवर श्रेयस बाद झाला आणि रोमहर्षक लढतीत पंजाबने दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...
कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला. ...