RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

डी'व्हिलियर्सने साकारलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगळुरुने दिल्लीवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 07:33 PM2018-04-21T19:33:48+5:302018-04-21T23:48:09+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DD, IPL 2018 LIVE: Bangalore won the toss and elected to bowl | RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देडी'व्हिलियर्सने 39 चेंडूंत  10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 90 धावांची खणखणीत खेळी साकारली.

बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

बंगळुरु : शनिवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंगावले ते  ' एबी ' नावाचे वादळ. या वादळापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाला नतमस्तक व्हावे लागले. पंतच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजी करताना 174 धावा करता आल्या. पण डी'व्हिलियर्सने साकारलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगळुरुने दिल्लीवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

बंगळुरुची 2 बाद 23 अशी अवस्था असताना डी'व्हिलियर्स फलंदाजीला आला. सुरुवातीपासूनच डी'व्हिलियर्सने तसलीही तमा न बाळगता फटकेबाजीला सुरुवात केली. तेराव्या षटकात एक षटकार आणि चौकार लगावत डी'व्हिलियर्सने 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही सातत्याने फटकेबाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. डी'व्हिलियर्सने 39 चेंडूंत  10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 90 धावांची खणखणीत खेळी साकारली.

11.26 PM : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय

11.09 PM : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड

- ट्रेंट बोल्ट सोळाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोरे अँडरसनला त्रिफळाचीत केले.

10.58 PM :  बंगळुरु 15 षटकांत 3 बाद 140

10.55 PM : SIX....डी'व्हिलियर्सचा झंझावात....

10.51 M : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक

- तेराव्या षटकात एक षटकार आणि चौकार लगावत डी'व्हिलियर्सने 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. डी'व्हिलियर्सच्या अर्धशतकामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या समावेश होता.

10.50 PM : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण

10.44 PM : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल

- ट्रेंट बोल्टने अकराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराट कोहलीचा सीमारेषेवर भन्नाट झेल पकडला. काही काळ कोहलीला हा झेल घेतल्याचा विश्वास बसला नाही.

10.40 PM : बंगळुरु 10 षटकांत 2 बाद 82

10.38 PM : डी'व्हिलियर्सचा उत्तुंग षटकार

-  डी'व्हिलियर्सने दहाव्या षटकात उत्तुंग षटकार लगावला, यावेळी चेंडू स्टेडियमच्या छताला लागला.

10.26 PM : : डी'व्हिलियर्सची चौकारांची हॅट्ट्रिक

- नदीमच्या सातव्या षटकात डी'व्हिलियर्स सलग तीन चौकार लगावले.

10.23 PM : विराट कोहलीला जीवदान

- कोहलीला 14 धावांवर असताना शाहबाझ नदीमच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रीषभ पंतने झेल सोडत जीवदान दिले.

10.19 PM : विराट कोहलीचा षटकार

- विराट कोहलीने ख्रिस मॉरीसच्या सहाव्या षटकात दमदार षटकार लगावला.

10.17 PM : डी'व्हिलियर्सची सलग दोन चौकार लगावत चांगली सुरुवात

10.15 PM : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात

- विराट कोहलीबरोबर योग्य समन्वय न झाल्याचा फटका डी'कॉक बसला. डी'कॉकने एक चौकार आणि षटकार लगावत 18 धावा केल्या.

10.12 PM : डी'कॉकचा दमदार षटकार

- डी'कॉकने मॅक्सवेलच्या चौथ्या षटकात षटकार वसूल केला.

10.05 PM : बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद

- ग्लेन मॅक्सवेलने दुसऱ्या षटकात बंगळुरुचा सलामीवीर मनन व्होराला बाद केले. जेसन रॉयने व्होराचा अप्रतिम झेल पकडला.

10.00 PM : डी'कॉकने केली चौकाराने डावाची सुरुवात

- डी'कॉकने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार वसूव करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.

'पंत'नी केली बंगळुरुची चंपी; दिल्लीच्या 174 धावा

बंगळुरु : रीषभ पंतने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची शनिवारी चांगलीच चंपी केली. पंतच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजी करताना 174 धावा करता आल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पण श्रेयस अय्यरने बंगळुरुच्या गोलंदाजीवर हल्ले करायला सुरुवात केली, पण त्याने 31 चेंडूंत 52 धावांची खेळी साकारली. श्रेयस बाद झाल्यावर पंतने आपल्या दणकेबाज फटकेबाजीने बंगळुरुच्या तोंडचे पाणी पळवले. पंतने 48 चेंडूंत 6 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 85 धावांची तुफानी खेळी साकारली.

9.43 PM : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान

9.40 PM :  रीषभ पंत OUT

- अखेरच्या षटकात फटकेबाजी करतना पंतला आपील विकेट गमवावी लागली. पंतने 48 चेंडूंत 6 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 85 धावांची तुफानी खेळी साकारली.

9.39 PM : रीषभ पंतचा दमदार षटकार

9.37 PM : रीषभ पंतची धडाकेबाज फटकेबाजी; 19 व्या षटकात फटकावल्या 18 धावा

9.27 PM :  रीषभ पंतचे चौकारासह अर्धशतक

9.22 PM : रीषभ पंत तळपला; चहलच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार

9.17 PM : ग्लेन मॅक्सवेल बाद; दिल्लीला चौथा धक्का

- युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने मॅक्सवेलचा अप्रतिम झेल पकडला. मॅक्सवेलला चार धावा करता आल्या.

9.07 PM : दिल्लीला तिसरा धक्का; श्रेयस अय्यर बाद

8.58 PM : सलग दुसरा षटकार लगावत श्रेयसचे दिमाखात अर्धशतक

8.47 PM : दिल्ली 10 षटकांत 2 बाद 58

8.40 PM : दिल्लीच्या श्रेयस अय्यरचा दमदार षटकार

8.27 PM : दिल्लीला दुसरा धक्का; जेसन रॉय बाद

8.22 PM : दिल्ली पाच षटकांत 1 बाद 22

8.09 PM : दिल्लीला पहिला धक्का; गौतम गंभीर बाद

- उमेश यादवने आपल्या तिसऱ्या षटकात दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. गंभीरला तीन धावा करता आल्या.

8.05 PM : उमेश यादवचा भेदक मारा, पहिल्या षटकात दिली फक्त एक धाव

7.31 PM :  दिल्लीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघाबाहेर

7.30 PM : बंगळुरुचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

कोहलीसेनेपुढे दिल्लीचे 'गंभीर' आव्हान

बंगळुरु : विजयासाठी उत्सुक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यांचे लक्ष्य विजय मिळवून गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवण्याकडे असेल. दोन्ही संघ अजून चारपैकी एकच सामना जिंकू शकलेला आहे. मागच्या सामन्यात बंगळुरुला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्सला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने केकेआरकडून झालेल्या पराभवानंतर पुढच्या सामन्यात पंजाबला पराभूत केले. त्यानंतर आरसीबीला राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला. 

 

दोन्ही संघ



 



 

 

 

बंगळुरु आणि दिल्ली संघांचे स्टेडियममध्ये आगमन



 

Web Title: RCB vs DD, IPL 2018 LIVE: Bangalore won the toss and elected to bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.