बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू काम करणार असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले होते. पण आता तापसी नव्हे तर संजय लीला भन्साळीची आवडती अभिनेत्री या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
अलीकडे एका जाहिरातीत दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. एक्स- बॉयफ्रेन्ड रणबीरसोबतची दीपिकाची ही कमर्शिअल अॅडफिल्म कमालीची लोकप्रिय झाली. पण यानंतर दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत एक अॅडफिल्म साईन केली. ...
आगामी काळात कंगना रणौत एकता कपूरचा 'मेंटल है क्या' आणि अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' सिनेमात झळकणार आहे. तसेच तमिलनाडुच्या दिवंगत पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक सिनेमात झळकणार आहे. ...
लक्ष्मी 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या सिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या भीषण घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. ...
लव्ह आज कल आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. ...