बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती. ...
Cannes फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली आणि आपला क्लासी लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी फॅन्ससोबतच क्रिटिक्सच्या मनाचा ठाव घेतला. ...
बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोणने नुकतेच मेट गालामध्ये आपल्या सौंदर्यांने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. ...