बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
जेव्हा सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली तेव्हा तिने ड्रग्सची बाब मान्य केली होती. तिने यावेळी बॉलिवूडमधील २५ मोठ्या सेलिब्रिटींची नावे घेतली होती. ...
Sushant Singh Rajput Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे. तर गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे. ...
यावर्षीच्या टाइम १०० च्या यादीत समावेश असणारा आयुष्मान खुराणा हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. त्याच्या या यशासाठी दीपिका पादुकोणने एक नोट लिहिली आहे. ...