‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. Read More
सध्या मध्यप्रदेशातील महेश्वर येथे सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु आहे. पण शूटींग सुरु होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही, तोच हा चित्रपट वादात सापडला आणि खुद्द सलमानला या वादावर खुलासा द्यावा लागला. ...
भाईजान सलमान खानची बातचं न्यारी. सध्या सल्लू मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. साहजिकचं मंडलेश्वर येथील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ...
सलमान खानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले. ...
‘रेस 3’नंतर पुन्हा एकदा भाईजान सलमान खान बॉबी देओलवर मेहरबान झालेला दिसतोय. होय, भाईजानच्य ‘दबंग 3’ या चित्रपटात बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे. ...