अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ...
बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर मान्सून पूर्व दिशेने आणखी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...