Devendra Fadnavis criticize on Uddhav Thackeray again, now 5 major demands | देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

मुंबई : राज्यात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. निसर्ग चक्रीवादळात ठाकरे सरकारनं केलेल्या तुटपुंज्या मदतीवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारनं केलेली मागणी अतिशय कमी आहे. कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरानंतर आम्ही जेवढी मदत केली, त्याच पद्धतीनं निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त लोकांना मदत केली जावी. 100 कोटींची मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. 

यावेळी ठाकरे सरकारकडे त्यांनी ५ प्रमुख मागण्याही केल्या आहेत. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत केली होती. तशाच प्रकारची मदत केली पाहिजे. कोल्हापूरसाठी 4800 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांना एकूण 6800 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. आता जाहीर केलेले 100 कोटी अतिशय तुटपुंजे आहेत. त्या रकमेत वाढ करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. एकट्या महाराष्ट्रात 35 हजार सॅम्पल टेस्ट करू शकतो, मात्र आपण फक्त 15 हजार टेस्ट करतोय. आज भारतात प्रतिदिन तीन लाख PPE किट तयार होतात. महाराष्ट्रातल्या फक्त 27 टक्के चाचण्या मुंबईची होत आहेत. मुंबईत कोरोनाच्या अधिक चाचण्या होणं आवश्यक आहे. ग्रामीण 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपये रोख, असे पैसे त्यावेळी पीडितांना दिले होते, आताही सरकारने त्याच पद्धतीने तातडीची मदत केली पाहिजे. जी घरं 15 टक्क्यांपेक्षा जास्त पडली आहे आपण त्यांना दुहेरी मदत केली पाहिजे. घरदुरुस्ती, जनावरांच्या गोठ्यांसाठी टपरी, छोटी दुकानं यांनाही सरकारने नव्याने उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे.

हेही वाचा

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devendra Fadnavis criticize on Uddhav Thackeray again, now 5 major demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.