never said pm should be removed mamatas response to criticism by bjp | पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य कोरोनाचं संकट आणि चक्रीवादळाचा सामना करत आहे. आपण कोरोना आणि अम्फान यांसारख्या संकटांविरोधात लढत असून, जनतेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशात काही राजकीय पक्ष मला हटवण्यास सांगत आहेत. मी कधीच म्हटलं नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतून हटवलं पाहिजे. ही राजकारण करण्याची वेळ आहे का?, गेल्या तीन महिन्यांपासून ते कुठे होते?, आम्ही जमिनीवरच काम करतो आहोत.

पश्चिम बंगाल कोरोना आणि कट रचणाऱ्यांवर मात करेल, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पर्यावरण दिनाच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आव्हानांचा पाढाच वाचून दाखवला आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना वेळेवर पैसे देणे आणि चक्रीवादळाने पीडित लोकांना मदत करण्यासारख्या समस्या आहेत. आधीच 25 लाख शेतकर्‍यांना नुकसान सोसावं लागतं आहे आणि घरे गमावलेल्या 5 लाख कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 

बंगाल सरकारने 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता, त्यावर भाजपानं  टीका केली होती. केंद्राकडून पैसे मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींचं सरकार करत असल्याचा भाजपानं आरोप केला होता. भाजपानं ममता बॅनर्जींच्या मागणीची खिल्ली उडवली होती. 

हेही वाचा

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत

संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: never said pm should be removed mamatas response to criticism by bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.