देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bihar Assembly Election 2025 News: बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ...
Congress MLA H D Rangnath: कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले. ...