देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
इंडिया आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती. ...
Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. ...
Lok Sabha Speaker Election 2024: ओम बिर्ला (Om Birla) आणि के. सुरेश (K. Suresh) यांच्यात होत असलेल्या लोकसभा अध्यक्षपदाच्या लढतीत कुणाचं पारडं जड आहे आणि लोकसभेतील आकडे कुणाच्या बाजूने आहेत. याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...
Seat Sharing Mahayuti vs MVA : अजित पवार बारामतीचे मतदान झाल्यानंतर कुठेच प्रकाशझोतात आलेले नाहीत. यामुळे येती विधानसभा तिन्ही पक्ष एकत्र लढतील का की शिवसेना भाजपाला अजित पवारांना बाजुला करायचे आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच तिकडे मविआमध्ये ...
The Emergency 1975: आणीबाणीदरम्यान संजय गांधी यांनी देशात अमेरिकेप्रमाणे राष्ट्रपती शासन प्रणाली लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली होती. तसेच देशातून निवडणूक प्रणाली संपुष्टात आणून इंदिरा गांधी यांना आजीवन राष्ट्रपतिपदी नियुक्त करण्या ...