देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Vijay Wadettiwar News: तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ...
दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे... ...
Maharashtra Assembly Session 2024: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे सी-२ वर आधारित हमीभाव द्यावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज विधासभेत केली आहे. ...
Narendra Modi Speech in Rajya Sabha: काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी (Narendra Modi) राज्यभेत राष्ट्रपतीं ...
पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला. ...