देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. ...
Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. ...
काँग्रेस मूळ पक्ष भाजपात विलीन झालेला नाही तर काँग्रेस विधिमंडळ पक्ष विलीन झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, असे निरीक्षण सभापतींनी याचिका फेटाळताना नोंदविले. ...
Congress Criticize Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. ...