देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Nagpur Crime News: आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्याच दिवशी नागपुरातील चंद्रमणी नगरात खळबळ घटना घडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ...
Election Commission on Vote Jihad: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या नेत्यांकडून व्होट जिहाद शब्द वापरला जात आहे. देवेंद्र फडणवीसांपासून ते किरीट सोमय्यांपर्यंत भाजपाच्या नेत्यांनी याबद्दल विधानं केली आहेत. ...