देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Parliament Budget Session 2025: संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ...
Harshavardhana Sapkal News: सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. ...
Bhupesh Baghel News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानावर सीबीआयने धाड टाकली आहे. रायपूर आणि भिलाई अशा दोन ठिकाणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ...