देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. २०१४ ला आपापली ताकद आजमावण्यासाठी चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी चारही पक्षांच्या नेत्यांना लढण्याची संधी मिळाली होती. ...
कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ...
उद्धव ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ती प्रशासकीय चूक असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. ...
मविआतील तिन्ही प्रमुख पक्षांनी ८५-८५-८५ अशा नव्या फॉर्म्युल्यावर एकमत केलं असून उर्वरित ३३ जागांवर उद्या अन्य मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...