देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गेल्या काही वर्षांमध्ये गटातटाचे राजकारण ही काँग्रेसची ओळख बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरार यांनी गटातटाचे राजकारण न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. ...
देशात आज घडीला काँग्रेस बॅकफूटवर गेलेले आहे. मात्र बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना सत्ताधारी पक्षांत चांगलीच मागणी असल्याचे समजते. या पार्शवभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. ...
शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीने मनापासून सहकार्य केले तरच उमेरखेडमधून काँग्रेसला चमकदार कामगि ...