देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कणकवली विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेस पक्षाचाच आमदार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही इतर पक्षांबरोबर आघाडी झाल्यास हा मतदार संघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. त्यासाठी वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचे सर्वानुमते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठ ...
आपण काँग्रेससोबत असल्याचे आता राहुल बोंद्रे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बोंद्रे यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
‘राष्ट्र्वादी’चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असे सूचक वक्तव्य करून ‘आयारामां’चे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे... ...
महानगरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस-काँंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईतील प्रचाराचा नारळ मंगळवारी फुटणार आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसही काही बोलत नाही. ...
उत्तर प्रदेशमधील भाजप नेते चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित विद्यार्थिनीच्या समर्थनार्थ तिच्या पदयात्रा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ८० काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...