देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतरही अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. ...
बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीए व महागठबंधन यापैकी कोण जिंकणार याची देशभर उत्सुकता आहे. या निकालामुळे केंद्रातील एनडीए सरकारमधील समीकरणेही बदलू शकतात. ...
पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही. ...
Harish Ravat Car Accident: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांच्या कारला आज मोठा अपघात झाला. सुदैवाने हरिश रावत हे या अपघातातून बालंबाल बचावले. हा अपघात दिल्ली-देहराडून बायपासवर झाला. ...