देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
AAP Congress Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यात आम आदमी पक्षाने काँग्रेसबद्दल घेतलेल्या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
Congress cwc meeting: काँग्रेस कार्य समितीचे विशेष अधिवेशन बेळगावात होत असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या बॅनर्सवरील भारताच्या नकाशावरून भाजपने घेरलं आहे. ...
Punjab Politics News: पंजाबमध्ये एका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी करण्याचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला होता. मात्र याची कुणकुण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना लागल्यानंतर सदर प्रयत्न थांबवण्यात आले. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी एनडीए नेत्यांशी चर्चा केली. यावेळी अमित शहा म्हणाले की, आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा. ...