देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Election Commission vs Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज राहुल गांधी यांनी मागितले होते. ते आता ४५ दिवसांत नष्ट केले जाणार आहे. ...
Shashi Tharoor news: थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. ...
Nana Patole on election commission of india: निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या ४५ दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
Narendra Modi in Bihar: 'देशाने गरीबी हटावचे बरेच नारे ऐकले. आमच्या सरकारने गरिबी कमी करुन दाखवली. गेल्या दशकात २५ कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली. जागतिक बँकेने याचे कौतुक केले.' ...