देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress New Headquarter: देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झाल ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ...
Congress Nana Patole News: दोन्ही घटनांवर जो तमाशा सुरू आहे, त्याबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपा महायुती सरकारला माफ करणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...