देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कर्नाटकातील सत्तावाटपाबाबतच्या विविध चर्चांमुळे तेथील राजकारणही तापले आहे. डीके शिवकुमार यांना काँग्रेसचे चाणक्य मानले जाते, त्यांनी बुधवारी आपल्याच मंत्र्यांवर टीका केली. ...
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं पटोलेंनी सांगितले. ...
मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद पहिल्यापासूनच आहे. एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस सातत्याने मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. ...