देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Priyanka Gandhi News: काँग्रेस सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करताना या दोघांची विचारप्रणाली ‘भ्याड’ असल्याची टीका केली. तर, प्रमुख विरोधी पक्ष देशासाठी त्यागाची भावना जपत असल्याचे सांगितले. ...
काँग्रेसने काढून टाकलेल्यांमध्ये काही उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, २० सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसने १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय प्रमुख उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता... ...
महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...
Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कांचा पुरस्कार करत रविवारी ‘व्हाइट टी-शर्ट अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्रातील सरकारला गरिबांची काळजी नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ...