देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Telangana Congress News: काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ...
Union Budget 2025: लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर खोचक शब्दात टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ...
Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole News: धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. ...