देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी नेमके काय करायचे?, संघटनात्मक बदल करायचे की नाही? ...
"मी अनुमानांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला खात्री आहे की, हायकमांडला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना संधी देण्यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल..." ...
शहर आता राहण्यालायक राहिले नाही, या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपला काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला ...