देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Pradnya Satav BJP: काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी तथा माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या. सातव यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...
Pragya Satav Resignation: मराठवाड्यात काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...