क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
मल्लांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदक पटकावण्याच्या मोहिमेत आज आपले योगदान दिले, तर नेमबाजी व मैदानी स्पर्धेतही भारताच्या पदरात काही पदकांची भर पडली. ...
आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे. ...
राष्ट्रीय स्पर्धेतील सोनेरी कामगिरी केल्यानंतर आॅलिम्पिकसाठी डावलले गेल्यानंतरही हार न मानता मराठवाड्याचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने आज राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या गटात आपणच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करताना भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्याच्या ...
महाराष्ट्राचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने मांडीला झालेल्या दुखापतीनंतरही जबरदस्त कामगिरी करताना गोल्डकोस्ट येथे गुरुवारी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिंकलेले ह ...
आपले गुरू दिवंगत हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांच्यासाठी गोल्ड कोस्ट इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचंय, अशी इच्छा त्यानं 'लोकमत'कडे व्यक्त केली होती. ...