आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. ...
लोकांच्या मनात काय चालले आहे, याकडे मोदींनी दुर्लक्ष केले. शिवाय सरकार, मंत्री व पक्ष अतिशय अहंकाराने वागू लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हणाले. ...
काँग्रेसचा उत्साह कायम राहिला आणि येणाऱ्या काही महिन्यांत इतर पक्षांनी त्यांची ताकद वाढविली, तर लोकसभेच्या येत्या निवडणुकाही त्यांना जिंकता येणार आहेत. तशी भीती भाजपाच्या मनात आता निर्माणही झाली आहे. ...