Decision-makers of farmers, tribals, in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये शेतकरी, आदिवासींची मते निर्णायक
छत्तीसगडमध्ये शेतकरी, आदिवासींची मते निर्णायक

- साहेबराव नरसाळे 

छत्तीसगडमध्ये विधानसभेप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीतही शेतकरी, आदिवासींचे मतदान निर्णायक ठरणार आहे़ भाजपाने बुधवार संध्याकाळपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. पण राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १0 खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा
निर्णय भाजपाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांतून भाजपाची सत्ता गेली. त्यामुळे भाजपाने १0
खासदारांना घरी बसवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. रमणसिंह यांचे पुत्र व राजनांदगाव मतदारसंघातून २0१४ साली लोकसभेवर निवडून गेलेले अभिषेक सिंह यांनाही यंदा उमेवारी
मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण डॉ. रमणसिंह यांना मात्र लोकसभेला उभे करण्याचा भाजपाचा विचार दिसत आहे. अन्य
मतदारसंघांतही नव्या चेहऱ्यांना उतरविण्याचा भाजपमध्ये खल सुरु आहे तर काँगे्रसने पाच आदिवासी उमेदवारांची घोषणा केली आहे़
छत्तीसगडमधील ११ जागांसाठी चार जागा अनुसूचित जाती जमातीसाठी तर १ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, उर्वरित ६
जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत़ यातील चार अनुसूचित जाती जमाती व एका अनुसूचित जमातीच्या जागेवर काग्ँ ास््रे ान े उमदे वार जाहीर के ल े आहेत़
विधानसभेतील विजयामुळे काँगे्रसकडे यंदा इच्छुकांची मोठी सख्ं या होती़ काग्ँ ास््रे ाच े पभ््र ाारी पी़ एल़ पुनिया यांच्या बैठकीत तब्बल १७६ नावांवर चर्चा केली होती़ त्यातून आदिवासी मतदारसंख्या अधिक असलेल्या पाच मतदारसंघांतील उमदे वार काग्ँ ास््रे ान े जाहीर के ल े आहेत़ पाच खुला प्रवर्गातील उमेदवारांची  घोषणा होणे बाकी आहे़ भाजपाचे प्रभारी अनिल जैन, आदिवासी नेते व
नवनियक्ु त पद्र श्े ााध्यक्ष विक्र म उसडें ी  यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर सर्व खासदारांना घरी बसवण्यात येणार असल्याचे अनिल जैन यांनी सूचित के लच्े ा आहे. काग्ँ ास््रे ाच े उमदे वार जाहीर झाल्यानंतर भाजपाचे उमेदवार जाहीर होतील, असे जैन यांनी स्पष्ट केले.
११ एप्रिल रोजी बस्तर, १८ एप्रिल रोी काकं े र, राजनादं गाव, महासमुंद  तर २३ एप्रिल रोजी रायपूर, दूर्ग,  बिलासपूर, जांजगिर चांपा, कोरबा, रायगड, सरगुजा येथे मतदान होईल. यंदा १३ लाख तरुण मतदानाचा हक्क बजावतील.बस्तर कांकेर, राजनांदगाव, महासमुंदसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.

जनता काँग्रेस फुटली 

काग्ँ ास््रे ामधन्ू ा २०१६ मध्य े बाहेर पडून जनता काग्ँ ास्े्र ा पक्ष काढणाऱ्या अजित  जोगी यांची पाच निष्ठवंतांनी साथ
सोडली असून, ते पाचही नेते काग्ँ ास््रे ामध्य े सामील झाल े आहेत़  विशेष म्हणजे या पाचही नेत्यांनी  जनता काग्ँ ास््रे ाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती़ त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता़


Web Title: Decision-makers of farmers, tribals, in Chhattisgarh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.