औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. ...
राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...