छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Chhagan Bhujbal : ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी आयोगाची स्थापना केली गेली मात्र त्या आयोगातील अनेक लोक आरक्षणाच्या विरोधात आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. ...
शिवसेनेकडून १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. कोर्टानं आता दोन्ही बाजूंना २६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. ...
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. ...