छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केले. राज्यपालांच्या त्या विधानावरून बराच वादंग निर्माण झाला. ...
Maharashtra Politics: छगन भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते आणि शिवसेना भुजबळांबद्दल काय काय बोलत होती, याची आठवण करून देत भाजपने ठाकरेंवर टीका केली. ...
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...