Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला केवळ १७ रुपये देणे आणि ही रक्कमसुद्धा शेतकऱ्यांना तीन हप्त्यात मिळेल, अशी परखड प्रतिक्रिया लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे. ...
सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी निवडणूकपूर्व वर्षामध्ये लोकानुनयी अर्थसंकल्पच सादर केला जात असतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. ते दर पाच वर्षांनी घडत असते. त्यामुळे हा अर्थसंकल्प तशा अर्थाने काही वेगळा नाही. ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असतो, या संकल्पनेला फाटा देत विद्यमान सरकारने एक विश्वासपूर्वक आणि दिशादर्शक अर्थसंकल्प सादर केला. ...