श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला ...
भाजपासोबत हातमिळवणी करून सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं पत्र लिहिण्यात आल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. ...
दाऊद इब्राहिम आपल्याच भूमीवर असल्याची कबुली पाकिस्तानने काल दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते अन्य दहा बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत. ...
Bihar Elections 2020 : बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्षकामात भाग घेतला असून बिहार प्रदेश कार्यकारिणीशी ऑनलाईन संवाद साधला आहे. ...
जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली. ...