श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Supreme Court News: राहुल गांधीं यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ...
कर्नाटकात आरएसएसवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आरोप केला आहे. ...
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल. ...