श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुख्यमंत्रीपदाच्या काळात राणा भीमदेवी थाटात जनतेस उपदेशाचे डोस पाजणाऱ्या ठाकरेंनी सत्ता, पक्ष आणि चिन्ह गमावताच विधिमंडळ सदस्यत्वाच्या जबाबदारीकडेही पाठ फिरविल्यामुळे त्यांच्यावर विश्वासून असलेल्या महाविकास आघाडीलाही घरघर लागली आहे. ...
आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मणिपूर संघर्ष लष्कर आणि आसाम रायफल्सच्या मदतीने सोडवला जाऊ शकत नाही, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ...
Narayan Rane : नारायण राणे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांना आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी निलंबित करण्यात येणार का, असा सवाल आपने विचारला आहे. ...