भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. Read More
Gujarat new cabinet news: गुजरातमध्ये अचानक विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. नव्या मंत्रिमंडळात रुपाणी यांच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्याने वाद उफाळला आहे. ...
उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. ...
विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. ...
पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. ...