पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद बुधवारी (दि.३) तिस-या दिवशीही गोंदिया शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटले. शहरातील विविध संघटनातर्फे ठिकठिकाणी सभा घेऊन व रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, ...
भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पाळला. बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात व्यावसायिक प्रतिष्ठाने, महाविद्यालये शाळा तथा पेट्रोलपंपही बंद होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/दिग्रस : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुसद आणि उमरखेड उपविभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पुसद शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद होती ...
भीमा-कोरगाव प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव आणि दारव्हा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाभूळगाव येथे यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्यात आली. दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला होता. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ घाटंजी, नेर, कळंब, राळेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दंगलखोर तसेच दंगल घडविण्यात सहभागी गावातील लोकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, .... ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनने निषेध नोंदविला आहे. या घटनेतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भीमा कोरेगा ...