मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. Read More
काही दिवसांपूर्वी भाग्यश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले होते. त्यानंतर आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...