बेस्ट उपक्रमाने मुंबईत अनेक ठिकाणी उभ्या केलेल्या बस थांब्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी गाड्या बस थांब्याबाहेरच उभ्या केल्या जात असल्याने, प्रवाशांची गैरसोय आणि बेस्टच्या बसगाड्या उभ्या करण्यातही अडचणी येत आहेत. ...
बेस्ट प्रशासनाच्या ट्रायमॅक्स कंपनीसोबत संपलेल्या कराराचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पंचमासिक पासचे पैसे घेणाऱ्या बेस्टकडून पासऐवजी केवळ पावती देण्यात येत आहे. ...
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मजुरांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने विद्युत विभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ...