लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्य ...
बीड : तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना मटकीतून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अन्न व औषध प्रशासनाने शाळेला तत्काळ भेट देऊन नमुने तपा ...
निपाणी जवळका फाट्याजवळील बारमध्ये बिल मागितल्याच्या कारणावरून सात जणांनी बारमालकाला मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध मारहाण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
तालुक्यातील उमरी (बु) येथील स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ५५ क्विंटल (१११ कट्टे) गहू काळ्या बाजारात नेला जात होता. ही माहिती पोेलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. मंगळवारी शहरातील बायपास रोडवर ट्रॅक्टर (एमएच ४४-५४३) येताच तो अडविण्यात आला ...
शहरातील नगर नाक्यावर सोमवारी मध्यरात्री झालेली लुटमार ही केवळ गांजा पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या १० तासांत छडा लावून दोघांना गजाआड केले होते. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोल ...
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार ...